ऑनलाईन मोफत शेळीपालन प्रशिक्षण व मार्गदर्शन शिबीर

ऑनलाईन मोफत शेळीपालन प्रशिक्षण व मार्गदर्शन शिबीर





एखादा कृषी-पूरक उदयोग सुरु करण्याचा विचार करताय का? भारतामध्ये पहिल्यांदाचय ऑनलाईन शेळीपालन प्रशिक्षण व मार्गदर्शन महाराष्ट्रातील नावाजलेली संस्था कृषी प्रसार फॉउंडेशन मार्फत संपूर्ण ऑनलाईन मोफत शेळी पालन शिबीर. प्रशिक्षक :डॉ . संतोष शिंदे (पशु धन विकास अधिकारी,महाराष्ट्र शासन) ऑनलाईन मोफत मार्गदर्शन व चर्चासत्र ०४/१०/२०२० रविवारी सकाळी ११. ०० वाजता ज्यामध्ये आपण शिकाल- • महाराष्ट्रातील शेळीपालन व्यवसाय • शेळ्यांच्या विविध जाती, पद्धती,शेड चे बांधकाम कसे करावे ? • त्यांच्या आहार,प्रजनन ,करडे व कोकराचे संगोपन • आजार व प्रतिबंधक उपाय यासह • शेळ्यांचा विमा , वाहतूक व विक्री या बाबींचे मार्गदर्शन • तसेच शासकीय योजना ,बँक कर्ज कसे उपलब्ध होईल चे मार्गदर्शन केले जाईल भारतात अनेक जोडधंदे आहेत. त्यातल्या त्यात शेतीपूरक आणि नफा देणारा व्यवसाय म्हणजे शेळीपालन हा व्यवसाय होय. आपल्या देशात शेळ्यांची संख्या इतर देशांच्या तुलनेत खूप मोठी आहे. त्यामुळे शेळीपालनासारखे जोडधंदे भारतात मोठय़ा प्रमाणात उभे राहत आहेत. पर्यायाने ग्रामीण भागाचा विकास होत आहे. कमीत कमी जागेत आपण आपले उत्पन्न व नफा कसा वाढवू शकतो, याविषयी शेळीपालन प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित केला आहे. यामध्ये शेळीच्या जातीची निवड कशी करावी, त्यांचे खाद्य, रोगराई नियंत्रण, आधुनिक पद्धतीचा निवारा कसा असावा, शेळ्यांचे लसीकरण व बंदिस्त शेळीपालनाबद्दल संपूर्ण माहिती दिली जाणार आहे. त्याचबरोबर व्यवसायाच्या आधुनिक आणि सुधारित वैज्ञानिक पद्धती, शासनाच्या विविध कर्ज योजना, अनुदान यासंबंधी संपूर्ण माहिती दिली जाणार आहे. इच्छुक शेतकरी मित्रांनी या संधीचा आवश्य लाभ घ्यावा. शिबीर wtsaap ग्रुप वर बघण्यासाठी ८८८८८८९४०७ हा नंबर आपल्या स्थानिक ग्रुप मध्ये जॉईन करावा. त्यावर आपल्या शिबिराच्या लिंक दिल्या जातील. आपल्याला ग्रुप जॉईन न करता सेमिनार बघावयाचे असल्यास आमचे फेसबुक पेज लाईक व youtube चॅनेल subscribe करा, त्यावर ही आपण शिबीर बघू शकतात व आपल्या अडचणी विचारू शकतात. 1) फेसबुक पेज लिंक : www.facebook.com/KrushiPrasar 2) youtube चॅनेल लिंक : www.youtube.com/krushiprasar 3) फेसबुक ग्रुप लिंक : www.facebook.com/KrushiPrasarFoundation मित्रांनो वरील मॅसेज आपल्या कामाचा नसला तरी आपल्या संपर्कातील शेतकऱ्याला शेअर करा. धन्यवाद कृषी प्रसार फॉउंडेशन,नाशिक ८८८८८८९४०७,८०८७८६२२





 

 

nashik.
04-10-2020