बीव्हीजीचे चेअरमन हणमंतराव गायकवाड यांचे मोफत ऑनलाईन मार्गदर्शन
कृषी प्रसार फाऊंडेशन (नाशिक) यांच्या वतीने रविवार दिनांक २७/०९/२०२० रोजी सकाळी ११ ते १२.१५ या वेळेत बीव्हीजीचे चेअरमन हणमंतराव गायकवाड यांचे मोफत ऑनलाईन मार्गदर्शन आयोजित करण्यात आले आहे. शेतीपुरक व्यवसाय व ग्रामिण अर्थक्रांती या विषयावर ते युवांना मार्गदर्शन करुन त्यांच्याशी संवाद साधणार आहेत.
बेरोजगार व व्यवसायाच्या संधी शोधणाऱ्या युवांसाठी हे मार्गदर्शन फायद्याचे ठरणार आहे.